आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरतची कोणतीही फाइल माझ्याकडे आली नव्हती : सुशीलकुमार शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -इशरत जहाँ प्रकरणाची फाइल माझ्याकडे आलीच नव्हती. त्यामुळे आपल्याला या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

इशरत प्रकरणाची कोणतीही फाइल माझ्याकडे कधीही आली नव्हती. त्यामुळे मला या प्रकरणाची काहीच माहिती नाही. माजी एनआयए अधिकारी लोकनाथ बेहरा यांनी केलेल्या टिप्पणीबद्दल विचारले असता बेहरा यांच्यासह याबाबतचे सर्व दावे बिनबुडाचे आहेत. माझ्याकडे कुणीही आला नाही आणि यासंबंधी माझ्याशी कोणीही बोलले नाही, असे शिंदे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. शिंदे हे संपुआ-२ सरकारमध्ये जुलै २०१२ ते मे २०१४ या काळात गृहमंत्री होते. काँग्रेसच्या नेतृत्वातील मागच्या संपुआ सरकारने इशरत जहाँचे लष्कर - ए- तोएबाशी संबंध असल्याबाबतच्या डेव्हिड हेडलीच्या साक्षीची मोडतोड केली होती, या आरोपाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे हे वक्तव्य आले आहे. २०१० मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी डेव्हिड हेडलीची चौकशी करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या एनआयटी पथकात केरळ केडरचे आयपीएस अधिकारी बेहरा यांचाही समावेश होता. हेडलीने इशरतबद्दल नेमके काय सांगितले होते, हे मला आठवत नाही. मात्र मुंबईच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हेडलीने दिलेल्या साक्षीत सांगितलेल्या बाबीच २०१० मध्ये एनआयटी पथकाला सांगितल्या होत्या, असे बेहरा यांनी म्हटले होते. अहमदाबादजवळ दिनांक १५ जून २०१४ रोजी इशरत (१९), जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई, अमजदाली अकबराली राणी आणि झिशान जोहार कथित बनावट चकमकीत मारले गेले होते.