आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde Admitted To Hospital In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशीलकुमार शिंदेंवर शस्‍त्रक्रि‍या यशस्‍वी, संसदेच्‍या सत्रात राहणार उपस्थित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रकृती खालावल्‍यामुळे त्‍यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्‍णालात दाखल करण्‍यात आले आहे. त्‍यांच्यावर आज (रविवार) शस्त्रक्रिया करण्‍यात आली. शस्‍त्रक्रि‍या यशस्‍वी झाली असून त्‍यांची प्रकृतीही उत्तम असल्‍याची माहिती त्‍यांची कन्‍या आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. सुशीलकुमार शिंदे संसदेचे पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. मात्र, नेमके कधी दिल्‍लीला जाणार, याबाबत अद्याप सांगण्‍यात आलेले नाही.

प्रणिती यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार शिंदे यांना शनिवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुशीलकुमार शिंदे शनिवारी नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या कार्यक्रमाला आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. तिथे त्‍यांना श्‍वास घेण्‍यात अडचण येत होती. त्‍यानंतर त्‍यांना ब्रीच कँडी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. शिंदेंना फुफ्फुसाच्‍या आजाराने त्रस्‍त केले आहे. त्‍यामुळे काही दिवसांपूर्वी ही शस्‍त्रक्रीया करण्‍याचे ठरले होते. डॉ. आर. देशपांडे आणि ए. जोग यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्‍त्रक्रि‍या करण्‍यात आली.

शस्त्रक्रियेनंतर सुशीलकुमार शिंदे यांनी तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांना दहा दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्‍यानंतरच ते दिल्‍लीला जातील.