आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशीलकुमार शिंदेंची Love Story होती \'सैराट\', 51 रुपयांत झाले लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी मुख्‍यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे बालपण आणि राजकारणाच्या पूर्वीचा जीवन प्रवास बराचसा खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर त्‍यांच्‍या घरची परिस्थिती खालावत गेली. ते आठवी पास झाल्‍यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिपाई म्हणून नोकरीला लागले. वकिलांना पुकारायचे ते काम करत होते. प्रतिकूल परिस्थितीला हसतमुखाने कसे तोंड द्यावे हे सुशीलकुमार यांच्‍या आयुष्‍यातून शिकायला मिळते. सुशीलकुमारांच्‍या आंतरजातीय प्रेमविवाहाचे किस्‍सेही रंजक आहेत. 1 मे रोजी शिंदे यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. यानिमित्‍त आम्‍ही सांगत आहोत काही रंजक बाबी.

- सुशीलकुमार शिंदे यांनी स्‍वत: त्‍यांच्‍या प्रेमविवाहाचे किस्‍से एका लेखातून सांगितले.
- सुशीलकुमार तेव्‍हा मुंबईत फौजदार होते. त्‍यांची वैद्य कुटुंबीयांशी ओळख झाली.
- त्‍यांचा मित्र सुभाष विळेकर या ओळखीतला महत्‍त्वाचा दुवा होता.
- विळेकर यांचा भाऊ वैद्यांचा जावई. त्यामुळे वैद्यांकडे त्‍यांचे अधूनमधून जाणे असे.
- शिंदे सांगतात - एकदा वैद्य कुटुंबातल्या उज्ज्वलाची आणि माझी नजरानजर झाली.
- पहिल्‍याच नजरेत ते उज्‍ज्‍वला वैद्य यांच्‍या प्रेमात पडले.
- पुढे घरी लग्‍नाच्‍या चर्चा सुरू झाल्‍यानंतर ते लग्नाला तयारही झाले.
- दोन्ही आया व नातेवाइकांनी समाजातल्या एका मुलीचे स्थळही आणले.
- शिंदे यांचे उज्‍ज्वलांवर प्रेम होते. पण समाजाच्‍या बंधनामुळे दुसरा साखरपुडाही झाला.
- मी तेव्‍हा चांगलाच द्विधा मनःस्थितीत सापडलो होतो, असे शिंदे सांगतात.
- परंतु नियतीचा खेळ फार वेगळा होता. त्‍यांच्‍या वाग्दत्त वधूचे एका आजाराने तीन महिन्यांत निधन झाले. आता अविवाहितच राहावे असे त्‍यांना वाटत होते.
बसच्‍या वरच्‍या मजल्‍यावर झाली दोघांची भेट..
मुंबईत तेव्हा डबल डेकर बस होत्‍या. अत्यंत तुरळक गर्दी असलेल्या बसच्या वरच्या मजल्यावर उज्ज्वलाची आणि सुशीलकुमार यांची भेट झाली. येथून पुढे त्‍यांच्‍या प्रेमाला नवीन पालवी फुटत गेली. दोघांनी चहा घेतला व आयुष्य एकत्रित कठण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, 51 रुपयांत कसे केले लग्न.. उच्चवर्णीयांतून आलेल्‍या उज्ज्वला कशा राहिल्‍या.., शिंदेंना होत्‍या दोन आई..,उज्ज्वला यांच्‍या घरून होता लग्‍नाला विरोध...