आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Chief Minister, Prithviraj Chavan, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशीलकुमार शिंदेंना सज्ज राहण्याच्या सूचना, राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली - राज्यात मुख्यमंत्री बदलाची जोरदार हवा असून काँग्रेसश्रेष्ठींनी सुशीलकुमार शिंदे यांना नव्या जबाबदारीसाठी तयार राहण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या चर्चेला खतपाणी देत काँग्रेसच्या वर्तुळात महाराष्ट्रासह तीन राज्यांतील मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा सुरू असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत असून गुलाम नबी आझाद आणि ए. के. अँटनी बैठकीत हजर असतील. मात्र, ही बैठक आगामी विधानसभेचे डावपेच ठरवण्यासाठी असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात येत आहे. शिंदे यांना या पदासाठी विचारणा करण्यात आल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. प्रकृतीच्या कारणावरून शिंदेंनी प्रारंभी ही जबाबदारी स्वीकारण्यास अनिच्छा दर्शवली. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार राहा, असा संदेश दिला असल्याचे हा नेता म्हणाला.

दरम्यान, आझाद व अँटनी बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींना अहवाल देतील. त्यानंतरच मुख्यमंत्री बदलाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण मात्र बदल होणार नसल्याबद्दल आश्वस्त आहेत. पुण्यात बोलताना ‘नेतृत्वबदलाबाबत पक्षश्रेष्ठींनी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे’, असे सांगून चव्हाण यांनी पक्ष देईल ती जबाबदारी समर्थपणे सांभाळण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.

पुढे वाचा पवारांकडे असणार प्रचाराची धुरा पवारांकडे...