आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushmita Tweets Over News Of She Marriage With Wasim Akram

लग्न आणि वसिम अक्रमसोबत, कधीही नाही; सुश्मिता सेनचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमसोबत आपण विवाह करणार नसून ही केवळ अफवा असल्याचे अभिनेत्री सुश्मिता सेन हिने शुक्रवारी ट्विट केले. काही दिवसांपासून या दोघांबाबतच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यावर सुश्मिता म्हणते, अशा बातम्या कोठून येतात हेच समजत नाही. वसिम माझा केवळ चांगला मित्र आहे आणि पुढेही राहील. त्याचा विवाह झाला असून तो त्यात आनंदी आहे. त्यामुळे असे बेजबाबदार विधान करणार्‍यांनी थोडा तरी विचार करावा. ज्या दिवशी मी विवाह करेल त्याची माहिती स्वत: तुम्हाला देईन, असेही ती म्हणाली. 37 वर्षीय सुश्मिताने रिनी आणि अलिशा या दोन मुली दत्तक घेतल्या आहेत.