Home »Maharashtra »Mumbai» Suspect Terrorist Arrested In Mumbai

लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला मुंबई विमानतळावर अटक; मुजफ्फराबादमध्ये घेतलय ट्रेनिंग

दिव्य मराठी वेब टीम | Jul 18, 2017, 07:53 AM IST

मुंबई-उत्तर प्रदेशात २००८ मध्ये सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यात सहभाग असलेला लष्कर-ए-तोयबाचा संशयित अतिरेकी सलीम मुकीम खान ऊर्फ अबू अमार ऊर्फ आरिफ याला सोमवारी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. दुबईहून परतल्यानंतर त्याच्या मुसक्या बांधण्यात अाल्या. फैजाबादेतून अटक केलेला आयएसआय एजंट आफताबच्या चौकशीत सलीमचा माग लागला होता. सलीमने मुजफ्फराबादच्या अतिरेकी कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्याची कबुली त्याने दिली हाेती.
फैजाबादमधून पकडण्यात आलेल्या आयएसआय एजंटचा सलीम हा फायनान्सर होता. सैन्याची माहिती पुरवण्याचे काम करणाऱ्यांना आर्थिक पुरवठा सलीम करायचा. लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतले आहे. सलीमकडून आणखी माहिती मिळण्यास एटीएसला मदत होणार आहे. आणखी किती एजंट सलीमसोबत काम करत आहेत, याचीही माहिती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Next Article

Recommended