आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspecting Husband Is Cruelty Of Wife Says High Court

पतीवर गैरविश्वास दाखवणे हे पत्नीचे क्रौर्य : उच्‍च न्‍यायालयाचा निर्वाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सुनावणीदरम्यान पत्नीने पतीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप करत गैरविश्वास दाखवणे क्रौर्याहून कमी नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात घटस्फोट मंजूर केला.

पत्नीकडून दाखवला जाणारा गैरविश्वास क्रौर्याचाच प्रकार आहे, या आधारावर दाखल झालेले घटस्फोट प्रकरण पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने 11 जुलै रोजी फेटाळले होते. याविरोधात पतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणीत न्या. जी. एस. पटेल आणि न्या. ओ. एस. ओक यांच्या पीठाने महेश व मोहिनी पायगुडे यांचा घटस्फोट मंजूर केला. पत्नीने विवाहबाह्य संबंधाचा संशय घेणे म्हणजे क्रौर्यच आहे. अशा संशयामुळे पतीला मानसिक त्रास होत असल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. महेश आणि मोहिनी यांचा विवाह 13 मार्च 2011 रोजी झाला होता. यानंतर त्यांच्यात मतभेद निर्माण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.