आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबन होण्यापूर्वी माहिती आयुक्त देशपांडेंचा राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळ्याप्रकरणी एसीबीने छापा घातल्यानंतर वादग्रस्त ठरलेले औरंगाबादचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांनी राज्य सरकारने राज्यपालांकडे निलंबनाची शिफारस केल्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. या राजीनाम्यावर राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी तो मंजूर होण्याचीच शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

सांताक्रुझ येथील ग्रंथालयाची जागा बिल्डरांना दिल्याबद्दल सुरू असलेल्या तपासातील प्रमुख आरोपी देशपांडे यांच्यावरील छाप्यात मोठे घबाड एसीबीच्या हाती लागले होते. एसीबीच्या एफआयआरमध्ये नाव असलेली व्यक्ती माहिती आयुक्त कशी राहू शकते, हा प्रश्न विचारला जाऊ लागल्याने राज्य सरकारने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला. मात्र ही शिफारस माहिती अधिकार कायद्याच्या कोणत्या कलमांतर्गत केली, याचा उल्लेखच राज्य सरकारने अहवालात केला नव्हता. त्यामुळे राज्यपालांनी या उल्लेखासह शिफारस करण्याची सूचना सरकारला केली होती. त्याआधीच नामुष्की टाळण्यासाठी देशपांडेंनी राजीनामा देऊन टाकला.
बातम्या आणखी आहेत...