आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित आयपीएस सुनील पारसकर सेवेत परतणार, पुनर्विचार समितीचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॉडेल बलात्कार प्रकरणात सत्र न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर निलंबित आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांना पुन्हा पोलिस सेवेत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या निर्णयामुळे निवृत्तीला अवघे दहा महिने शिल्लक असलेले पारसकर जानेवारी अखेरीस पुन्हा सेवेत परततील, अशी शक्यता आहे. तसेच यामुळे त्यांच्याविरोधातील विभागीय चौकशीही बंद होणार आहे.
सोमवारी मंत्रालयात गृह विभागाच्या निलंबन पुनर्विचार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव गृह के.पी.बक्षी, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पी.एस. मीणा, तसेच पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित हे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पारसकर यांच्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून अौपचारिक मान्यतेसाठी तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली. डिसंेबरमध्ये सत्र न्यायालयाने मॉडेल बलात्कारप्रकरणी पारसकर यांना क्लीन चिट दिल्यानंतर त्या विरोधात उच्च न्यायालयात अपील न करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता.
पदाेन्नतीचा मार्ग माेकळा
पारसकर हे १९९३ च्या बॅचचे असून १९९७ मध्ये त्यांना आयपीएस दर्जा बहाल केला अाहे. त्यांच्या निवृत्तीला अवघे दहा महिने शिल्लक असून त्यापूर्वीच सेवेत परत घेण्यात आल्याने त्यांच्या पदोन्नतीचा मार्गही मोकळा झाला आहे.

अाबांनी केले हाेते निलंबन
आॅगस्ट २०१४ मध्ये एका मॉडेलने पारसकरांवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पारसकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. सेवेत कसूर करत आणि आपल्या पदाचा दुरुपयोग झाल्याने केंद्रीय सनदी सेवा कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे हे निलंबन केल्याचे सांगत त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...