आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिरूपतीच्या दर्शनाला गेलेल्या बारामतीच्या 7 तरूणांचा अपघाती मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रातिनिधीक छायाचित्र)
पुणे- बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ, उंडवडी व सुपे या गावातील 7 तरूण भाविकांचा अपघाती मृत्यू रविवारी रात्री आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे झाला. तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनाला हे 7 ही युवक चालले होते. काल रात्री अडीच सुमारासच्या त्यांच्या स्कॉपिओला अपघात झाला. त्यात सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
ऋषिकेश गवळी, मोहन गवळी, शेखर गवळी, अनिल गवळी, सागर अंकुश रसाळ, सागर बाळासाहेब रसाळ, अजित रसाळ अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरूणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे भाविक स्कॉपिओ गाडी घेऊन बालाजीच्या दर्शनाला चालले होते. मात्र, आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे त्यांच्या गाडीला रात्रीच्या वेळी जोरदार धडक बसली. त्यात गाडीत असलेल्या 7 ही तरूणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे.
मृत्यूमुखी पडलेल्यांत बारामती खरेदी-विक्री संघाचे संचालक अंकुश रसाळ यांच्या मुलाचा समावेश आहे. परिसरातील 7 उमद्या तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावक-यांना धक्का बसला आहे.
बातम्या आणखी आहेत...