आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suzzane Khan Demands Over 400crores From Hrithik Roshan

सुझानला हवी 400 कोटींची पोटगी, हृतिकसमोर मोठा पेचप्रसंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडचा ‘क्रिश’ हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान रोशन-खान यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणाने आता नवेच वळण घेतले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सुझानने फारकत घेण्यासाठी हृतिककडे तब्बल 400 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे हृतिकसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मात्र, 380 कोटी रुपयांत दोघांत तोडगा निघू शकतो, अशी चर्चा आहे. परंतु हृतिककडून या सर्व प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसून त्यानंतरच याची विश्वासार्हता स्पष्ट होईल.

13 वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाच्या शानदार यशानंतर हृतिक रोशन देशातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. त्यानंतर कोई मिल गया, क्रिश, धूम यांसारखे दर्जेदार चित्रपट देऊन त्याने तरुणींच्या मनाचा ठाव घेतला. दरम्यान, 20 डिसेंबर 2000 रोजी त्याने बालपणीची मैत्रीण सुझान खान हिच्यासोबत लग्न केले. 13 वर्षे त्यांचा संसार सुखाने पार पडला. दरम्यान, या जोडप्याला रुहान आणि रुदान नावाची दोन मुले झाली. मात्र, मागच्या वर्षी त्यांच्या संसारात विघ्न आले आणि त्यांचा संसार काडीमोडापर्यंत येऊन पोहोचला. 13 डिसेंबर 2013 रोजी दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्यातील निर्णय होऊ शकतो.

घटस्फोटाचे कारण?

हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र, सुझानची अभिनेता अर्जुन रामपालशी वाढत असलेली जवळीक याचे एक कारण मानले जाते. शिवाय, अभिनेत्री बार्बरा मोरी आणि हृतिक रोशन यांच्यात काही तरी शिजत असल्याचा संशय सुझानला होता. त्यावरून दोघांत भांडणही झाल्याची चर्चा होती.

पुढील स्लाइडमध्ये, मुलांसाठी एकत्र