मुंबई - शिवसेनेचे एकमेव टार्गेट असलेल्या नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीत सलग दोनदा पराभवाची चव चाखायला लागल्याने आता त्यांनी शिवसेनेला वड्याच्या रूपाने टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी शिववड्याला टक्कर देण्यासाठी "स्वाभिमानी वडा' केंद्राची गुरुवारपासून मुंबईत सुरुवात केली. त्यामुळे आगामी काही दिवसात "शिववडा' विरुद्ध "स्वाभिमानी वडा' असा संघर्ष मुंबईत पाहयला मिळणार आहे.
नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी शिवसेनेमुळे झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा निश्चय केला असून यापुढे प्रत्येक ठिकाणी शिवसेनेपुढे आव्हान निर्माण करण्याचे ठरवले आहे. शिववड्याविरुद्धचे आंदोलन काही वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी सुरू केले होते परंतु ते बंद पडले. मात्र, आता पुन्हा नव्याने शिव वडापाव केंद्राना टार्गेट करण्याचे काम नितेश यांनी सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिव वडा केंद्राचे स्टिंग ऑपरेशन करून नितेश राणे यांनी शिव वडा केंद्र मराठी माणसाकडे नसून परप्रांतियांकडे असल्याचे दाखवून दिले होते. शिव वडापाव केंद्र अनधिकृत असून महानगरपालिकेने ते जप्त करावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. तेव्हाच
आपणही स्वाभिमानी वडा केंद्र सुरू करणार असल्याचे नितेश यांनी सांगितले होते. दरम्यान, टक्कर बरोबरीच्या लोकांना दिली जाते, कोणालाही द्यायची नसते. आम्ही खऱ्या अर्थाने मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव घेता लगावला.
पुढे वाचा, स्टाॅलला मनपाची परवानगी घेतली नाही