आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानी’चा अखेर ‘एनडीए’ला रामराम; सर्वच पक्षांपासून समान अंतर राखणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडत अाहे, असे पत्र संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी दिले. यापुढे आपण देशपातळीवर शेतकरी चळवळ उभारणीचे काम करणार असून सर्व राजकीय पक्षांशी समान अंतर राखून काम करणार असल्याचे शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले.  दरम्यान, संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी वस्त्रोद्योग मंडळाचा राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्र्यांनी ताे फेटाळून लावला. योग्य वेळ येताच त्याबाबत आपण निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

लोकसभा अाणि विधानसभा निवडणुकीत शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने (शेतकरी संघटनेने) भाजपबरोबर आघाडी केली होती. त्या बदल्यात संघटनेचे पूर्वाश्रमीचे नेते  सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपद, तर रविकांत तुपकर यांना वस्त्रोद्याेग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र, खोत यांच्याबरोबर शेट्टी यांचे बिनसले. परिणामी शेट्टी अाणि मुख्यमंत्री यांच्यात वादाला तोंड फुटले होते. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून त्यांच्यावरील कर्जाचा बोजाही वाढला आहे. खर्च सोडून पन्नास टक्के नफा मिळेल इतका शेतमालास भाव देण्याचे मोदी यांनी वचनही पाळले नाही, त्यामुळे आपण एनडीएमधून बाहेर पडत आहोत, असे शेट्टी यांनी सांगितले.   

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पूर्वीच मंत्री सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी केली आहे. मात्र, खोत यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी अद्याप घेतलेला नाही. खोत स्वाभिमानीला पर्यायी अशी शेतकरी संघटना स्थापन करणार असल्याचे 
सांगितले जाते.  

अाता शिवसेनेशी मैत्री?  
स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी एकमेव खासदार आहेत, तर सदा खोत भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर गेले आहेत. मागच्या आठवड्यात स्वाभिमानीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. खासदार राजू शेट्टी यांचे दक्षिण महाराष्ट्रातील प्रस्थापित काँग्रेस अाणि राष्ट्रवादी नेतृत्वाशी कट्टर शत्रुत्व आहे. त्यामुळे शेट्टी यांना पुढच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी िमत्रत्वाचे संबंध ठेवून आपला हातकणंगले मतदारसंघ टिकवण्याचा एकमेव पर्याय आता शिल्लक राहिला आहे.
बातम्या आणखी आहेत...