आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पनवेलमध्ये स्वाभिमानीची शिवसेनेशी आघाडी; शेट्टी आणि फडणवीस यांच्यातील दरी रुंदावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबईत नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्क शिवसेनेशी हातमिळवणी केली असून ही आघाडी संयुक्तपणे सर्व जागा लढवत आहे. या आघाडीमुळे स्वाभिमानी आणि भाजपमधील दरी वाढत जाणार असून उद्धव ठाकरे यांना मात्र राजू शेट्टी यांच्या रूपाने भाजपविरोधात नवा मोहरा मिळाला आहे.
    
२०१४ च्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर स्वाभिमानीची आघाडी होती. त्या निवडणुकीत स्वाभिमानीमुळे भाजपला दक्षिण महाराष्ट्रात चांगलाच लाभही झाला. त्याचे फळ म्हणून स्वाभिमानीच्या सदा खोत यांना मंत्रिपद देण्यात आले. परंतु खोत आणि शेट्टी यांच्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद पनवेल महापालिका निवडणुकीत उमटत आहेत.   

पनवेल महापालिकेच्या ७० जागांसाठी २४ मे रोजी मतदान होत आहे. भाजप, शिवसेना आणि शेकाप यांच्या वेगवेगळ्या आघाड्यांचा येथे तिरंगी सामना आहे. येथे स्वाभिमानीची भाजपशी आघाडी होईल असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात स्वाभिमानीने शिवसेनेचा हात पकडला. शिवसेना ६५, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना १३ जागा लढवत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्द्यावर दोघे एकत्र आले आहेत. पनवेल परिसरात सातारा, सांगली, कोल्हापूर पट्ट्यातील माथाडी कामगार मोठ्या संख्येने आहेत. या तिन्ही जिल्ह्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटना मजबूत अाहे. त्याचा लाभ शिवसेनेला या निवडणुकीत आपसूक होणार आहे, तर स्वाभिमानीने शिवसेनेशी हातमिळवणी करून भाजपला खिंडीत पकडल्याचे बोलले जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...