आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swine Flu Issue In High Court, 41 Death In State

स्वाइन फ्लूचा प्रश्न हायकोर्टात, राज्यात ४१ बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्यात स्वाइन फ्लू आजार बळावत चालला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत राज्यात या आजाराने सुमारे ४१ जणांचे बळी घेतले आहेत. स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी करणारा अर्ज सामाजिक कार्यकर्ते अनिल आग्रे यांनी उच्च न्यायालयात दाखल केला. या याचिकेवर न्यायालयाने सार्वजनिक आरोग्य विभागाला नोटीस बजावून स्वाइन फ्लू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनेबाबत माहिती विचारली.

दरम्यान, नागपुरात बुधवारी एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून, शहरात आत्तापर्यंत बळींची संख्या २४ वर गेली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूवर उपचार घेत असलेली आशा गुरिले (वय ३६) ही महिला बुधवारी सकाळी मरण पावली. राज्यातील स्वाइन फ्लू बळींचा आकडा ४१ पर्यंत पोहोचला असून, बळींमध्ये नागपूर शहर आघाडीवर आहे.