आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटांमध्ये महिलांवर होणा-या अत्याचाराच्या दृश्यांवर सेंसॉर बोर्डाची कात्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चित्रपटांमध्ये महिलांवर होणा-या अत्याचाराच्या दृश्यांवर सेंसॉर बोर्डाने निर्दयीपणे कात्री चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चित्रपटांमधील महिलांना होणा-या मारहाणीची दृश्ये पास केली जाणार नाहीत.मात्र त्याच वेळेस छोट्या पडद्यावर महिलांवरील मारहाणीच्या दृश्यांना आळा कोण घालणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये विचारला जात आहे.

सेंसॉर बोर्ड सदस्याने दिव्य मराठीला माहिती देताना सांगितले की, चित्रपटांमध्ये महिलांवरील अत्याचार व मारहाणीच्या दृश्यांना कात्री लावण्याचा निर्णय आहे. परंतु दिल्ली समूह बलात्कारानंतर अशा दृश्यांवर निर्दयीपणे कात्री लावण्याचे तोंडी आदेश आम्हाला देण्यात आलेले आहे. महिला या बुद्धी, शक्ती, लक्ष्मी आणि सरस्वतीचे प्रतीक आहे. मात्र चित्रपटात महिलांना मारहाणीची दृश्ये सर्रास दाखवली जात. या दृश्यांमुळे महिलांना समाजात कसलेही स्थान नसल्याचे चित्र निर्माण होत होते. ते होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणा-या नृत्यामध्येही पुरुष नर्तकांनी नर्तिकांना वा नायिकेला उचलून घेण्यावरही बंधन घालण्यात आले आहे. लवकरच प्रदर्शित होणा-या आई, मी और मैं चित्रपटात नायिका प्राची देसाईच्या तोंडी असलेल्या त्याच्याबरोबर झोपते शब्दाऐवजी त्याच्यारोबर राहाते असा शब्द बदलण्यात आला तो याचमुळे असेही सूत्रांनी सांगितले.
सेंसॉर बोर्डाने गेल्या दहा वर्षात 256 चित्रपटांना प्रमाणपत्र नाकारल्याचीही माहितीही माहिती अधिकारात उघड झाली आहे. 2006 मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 59 चित्रपटांना प्रमाणपत्र नाकारण्यात आले तर 2002 मध्ये 33 चित्रपटांना प्रमाणपत्र नाकारण्यात आले होते. 2010 मध्ये नऊ चित्रपटांना प्रमाणपत्र नाकारण्यात आले. चित्रपटांमध्ये 78 हिंदीचा समावेश आहे.