आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू सालेमच्या लग्नाच्या चौकशीचे आदेश टाडा न्यायालयाने दिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत 1993 ला झालेल्या साखळी स्फोटातील आरोपी अबू सालेम याला पोलिस लखनऊला नेत असताना त्याने रेल्वेत लग्न केल्याच्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या. टाडा न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
कोठडीत असलेला आरोपी न्यायालयाच्या परवानगीशिवाय रेल्वेमध्ये लग्न कसे करू शकतो, याची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याचे सरकारी वकील दीपक साळवी यांनी सांगितले. एका वृत्तपत्रातील बातमीवरून न्यायालयाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.