(फोटो: आरोपी कासिम शेख)
मुंबई- मुंबईतील शिवाजी नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेविषयी पोलिस चौकधीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर बलात्कार केला होता. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे चार तुकडे करून कचराकुंडीत फेकून दिल्याची माहिती पोलिस चौकशीत उघड झाली आहे.
आरोपी कासिम शेख हा टेलर असून त्याने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी कासिम शेख याला अटक केले आहे. आरोपी कासिम शेख याने पोलिसांना सांगितले की, बलात्कारानंतर पीडितेच्या गृप्तांगातून रक्त निघात होते. रक्त पाहिल्यानंतर तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे चार तुकडे करून रात्रभर दुकानात लपवून ठेवले. नंतर मित्राच्या दुकानात रात्री झोपला. दुसर्या दिवशी मुलीच्या मृतदेहाचे चार तुकडे करून एका बॉक्समध्ये भरून तो कचराकुंडीत फेकून दिला.
काय आहे प्रकरण...
मुंबईतील बेंगनवाडी भागात गेल्या 24 ऑक्टोबरला एक अल्पवयीन मुलगी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. पोलिस मुलीचा शोध घेत असताना त्यांना एका मुलीचा मृतदेह सापडला. 12 वर्षीय मुलगी 24 ऑक्टोबरला घराजवळ असलेल्या टेलरकडे कपडे घेण्यासाठी गेल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. ती एकटी असल्याचा फायदा घेवून आरोप कासिम शेख याने तिच्यावर दुकानातच बलात्कार केला. नंतर तिची हत्या करून दुकानात तिचा मृतदेह लपवून ठेवला होता.नंतर मुलीच्या मृतदेहाचे चार तुकडे करून ते कपड्याच्या कात्रणांनी गुंडाळले आणि ते एका बॉक्समध्ये टाकून कचाराकुंडीत फेकून दिले.
असा पकडला गेला कासिम शेख...
मृतदेहाला गुंडाळण्यात आलेल्या एका कपड्यावर 'हकीम साहब' असे लिहिले होते. पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी अनेक टेलर्सची चौकशी केली. नंतर कासिम शेख याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.