आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त माळींना मुख्यमंत्र्यांच्या गावात नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे खासगी सचिव असताना जळगाव जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरशी गैरवर्तन केल्याची तक्रार झाल्याने वादग्रस्त ठरलेले सुनील माळी यांची अाता चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव अाहे. माळी हे नाशिक विभागात उपविभागीय अधिकारी होते. नंतर ते डॉ. सावंत यांचे खासगी सचिव म्हणून रुजू झाले होते. दरम्यान, महिला डाॅक्टरच्या तक्रारीनंतर माळी यांच्यावर कारवाई हाेईल अशी अपेक्षा असताना त्यांना केवळ खासगी सचिव जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. आता त्यांच्या पदस्थापनेचा नाशिक विभाग बदलून नागपूर विभागात बदली करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...