आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताज हाॅटेलने पंधरा दिवसांत दंड भरावा- रणजित पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंचतारांकित हॉटेल, मॉल्स आणि विविध कंपन्यांकडून फुटपाथवर होणाऱ्या अतिक्रमणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत मुंबईतील गेटवेसमोरील प्रसिद्ध ताज हॉटेलला महापालिकेने फुटपाथवर अतिक्रमण केल्याबद्दल दंड ठोठावला असून पंधरा दिवसांत दंडाची रक्कम भरण्याचे निर्देश हॉटेल व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृहे व कंपन्यांकडून इमारतीलगतचे फुटपाथ काबीज करण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याबाबत काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी लक्षवेधी मांडली होती. हॉटेल ताज व ओबेराय यांनी अशाच प्रकारे अतिक्रमण केले असून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली हाेती. त्यावर राज्यमंत्री पाटील म्हणाले की, अतिक्रमणाबाबत महापालिकेने ताज हॉटेलला ६ कोटी ९१ लाख तर हॉटेल ओबेरायला १६ लाखांचा दंड ठोठावला आहे. हॉटेल ओबेरायने दंडाची रक्कम जमा केली असून ताजने मात्र अद्याप दंड भरलेला नाही. ताजला अाता पंधरा दिवसाची अंतिम मुदतवाढ दिली असून त्यानंतर कारवाई केली जाईल.’
बातम्या आणखी आहेत...