आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र- मुंबई - पुणे एक्‍स्‍प्रेस वेवर भीषण अपघात, चार ठार एक गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मुंबई - पुणे एक्‍स्‍प्रेस वेवर आज (बुधवार) सकाळी 10 वाजताच्‍या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्‍यू तर एक जण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना मळवली जवळ देवलेपूल (ता. हवेली) येथे घडली.
नेमके काय झाले ?
> मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्‍याने रस्‍ते निसरडे झाले.
> त्‍यामुळेच मुंबईहून पुण्‍याकडे येत असलेल्‍या कारचा अपघात झाला असावा, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.
> अपघातातील गंभीर जखमीवर उपचार सुरू आहेत.
> या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...