मुंबई - सोलापूरच्या जिल्हाधिका-याच्या मुजोरीमुळे आषाढीला पंढरपुरमध्ये पांडुरंगाची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रतीक्षा करावी लागली. या जिल्हाधिका-याची मस्ती उतरवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
जिल्हाधिकारी व त्यांची पत्नी हे मुख्यमंत्र्यांच्या आधीच पूजा करत बसल्याने मुख्यमंत्र्यांना २० मिनिटे थांबावे लागले. त्यांच्यावर कासवाची पूजा करण्याची वेळ आली. या मुजोर कलेक्टरला एवढी मस्ती आली असेल तर ती उतरवली पाहिजे, असे पवार म्हणाले. आषाढीला राज्यातील ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री महापूजा करतात, ही प्रथा आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच ही प्रथा पाळली गेली नाही, असा अाराेपही पवारांनी केला. ‘जिल्हाधिका-यांच्या या वागण्यामुळे महसूलमंत्री खडसे तर एवढे संतापले की ते पूजा न करताच परत जायला निघाले. परंतु, नंतर त्यांची समजूत काढण्यात आली’, अशी माहिती पवार यांनी दिली. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आपले अधिकार वापरायला हवे होते,’ असेही पवार यांनी सूचवले.
पुढे वाचा, जिल्हाधिका-यांवर खुनाचा गुन्हा नोंदवा