आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Action On Hospitals Which Not Treat Fairly To Patients High Court

रुग्णांना अडवणाऱ्या रुग्णालयावर कारवाई, उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बिलाचे पैसे नसल्याने रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करून याबाबत कायमचा तोडगा काढावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
याप्रकरणी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अॅमिकस क्युरी (न्यायालयाचा मित्र) माधव थोरात यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रुग्ण किंवा नातेवाइकांकडे बिलाचे पैसे नसल्याने काही रुग्णालयांनी त्यांना डांबून ठेवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुनावणीदरम्यान आठ हजार डाॅक्टरांच्या वतीने रुई रोडरिगस यांनी सांगितले, संघटना या प्रकाराचे समर्थन करत नाही. रुग्णांची अडवणूक होत असेल तर तातडीने उपाययोजना गरजेच्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.