मुंबई - सायलेन्स झाेन शिवाजी पार्कवर गुढीपाडव्याला राज ठाकरेंच्या सभेत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे मनसेवर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकार व महापालिकेला दिले अाहेत.कमाल ५० डेसिबल अावाजाची मर्यादा पाळण्याच्या अटीवर मनसेला मेळावा घेण्यास मिळाली हाेती. मात्र प्रत्यक्षात ११४ डेसिबलपर्यंत अावाज उंचावून मनसेने नियमांचे उल्लंघन केल्याने अायाेजकांवर कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले.
जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने मनसेचे माजी अामदार नितीन सरदेसाई व इतर अायाेजकांना अवमानना नाेटीसही बजावली अाहे.
पुढे वाचा... ६ एप्रिल राेजी मनसेला सभेची परवानगी देताना न्यायालयाने काही अटी घातल्या हाेत्या