आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Care There No Killing Soliders, Kadam Said To Danve

आपले जवान शहीद होणार नाहीत याची काळजी घ्या, दानवेंना रामदास कदमांचा टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘कोणतीही कला किंवा खेळाला आमचा विरोध नाहीच. मात्र, सीमेवर आपल्या सैन्यावर हल्ले करायचे, दहशतवाद माजवायचा व दुसरीकडे मैत्रीचा हात पुढे करायचा हे पाकचे धोरण योग्य नाही. याचे समर्थन करणे म्हणजे शहिद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सर्वप्रथम आपले जवान शहीद होणार नाहीत याची काळजी घ्यावी,’ अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी केली.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्या मुंबईत दौऱ्यावर विरोध करत सोमवारी शिवसैनिकांनी ‘बीसीसीआय’च्या कार्यालयात गोंधळ घातला होता. त्याला विरोध करत दानवे यांनी भारत- पाक क्रिकेट सामने व्हायलाच हवेत, अशी भूमिका मांडली होती. यावर कदम म्हणाले, ‘भारतात दहशत पसरविणाऱ्या पाकिस्तानशी संबंध ठेवण्यास आमचा विरोध आहे व राहील. आम्ही हिंदुत्वाशी कधीही तडजोड केलेली नाही. सगळ्या मुसलमानांना आमचा विरोध नसून देशात राहून गद्दारी करणारे व पाकचे झेंडे फडकावणाऱ्यांचा विरोध आहे. वाजपेयी यांच्या काळात भारताने पाकिस्तानात बससेवाही सुरू केली होती. दोन्ही पंतप्रधानांनी हातही मिळवले होते. तरी आजही सीमेवर आपल्या जवानांचे गळे कापले जातात व आपण मुंबईत पोलिस बंदोबस्तात त्यांचे कार्यक्रम घेतो. आम्ही सत्तेत आहोत म्हणून सहकाऱ्यांवर टीका करणार नाही परंतु ज्यांचा शिवसेनेच्या आंदोलनाला विरोध आहे त्यांनी त्यांनी पाकिस्तानात जावे,’ असा टोलाही कदम यांनी लगावला.

पुढे वाचा. ...तरीही सत्तेत एकत्र