आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Decision On Maratha Community Reservation Before Election Vinayak Mete

मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय निवडणुकीपूर्वी घ्‍या- विनायक मेटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील 25 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्यावा, अन्यथा राज्यात उग्र आंदोलन छेडण्यात येईल,’ असा इशारा राष्‍ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी मंगळवारी दिला. आरक्षणाचा प्रश्न आता अखेरच्या टप्प्यात असून काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षांचा विरोध नाही, असा दावा मेटेंनी केला.‘राजकीय आरक्षण आमची मागणी नाही.नोकरी आणि शिक्षणामध्ये आम्हाला 25 टक्के आरक्षण हवे आहे.

मराठा समाजाला काँग्रेसने आजपर्यंत सहकार्य केले, मग आरक्षणाला विरोध का? विरोध कायम राहिल्यास शिवसंग्राम संघटना जोरदार रान उठेवल,’ असा इशारा देत ‘आरक्षण देता की घरी जाता’ हे आमचे घोषवाक्य असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी समाजाचे नेते म्हणून मुंडे आणि भुजबळ नेहमी मिरवत असतात. पण ओबीसींसाठी त्यांनी काहीही केले नाही, अशी टीका मेटेंनी यावेळी केली.


इशारा मेळावे
मराठा आरक्षणाच्या जागृतीसाठी शिवसंग्राम संघटना राज्यभर इशारा मेळावे घेणार आहे. पहिला मेळावा 10 ऑक्टोबरला बीड, 24 नोव्हेंबरला पनवेल, 8 डिसेंबरला बुलडाणा, 5 जानेवारीला पंढरपूर आणि 19 जानेवारीला नाशिक येथे मेळावा होईल.5 जानेवारीला पंढरपूरहून आरक्षण हक्क यात्रेला प्रारंभ होऊन 11 फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चा काढला जाईल, असे मेटे म्हणाले.