आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूचा सेल्फी घेण्याची याची इच्छा, आता यामुळे आला पोलिसांच्या रडारवर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याला जीवघेणे सेल्फी टिपण्याचे वेड लागलेले आहे. - Divya Marathi
याला जीवघेणे सेल्फी टिपण्याचे वेड लागलेले आहे.

मुंबई- धोकादायक जागेवर उभे राहून स्टंट करणे आणि सेल्फी घेणे मुंबईतील एका तरूणाला महागात पडले आहे. धोकादायक सेल्फीच्या व्हिडिओ आणि फोटोजचे हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहचले आहे. यामुळे त्याला आता पोलिस ठाण्याची वारी करावी लागणार आहे. स्वत:ला देशातील पहिला 'अर्बन फ्री क्लायंबर' सांगणा-या या तरूणाच्या कृत्यापासून वाचण्यासाठी व्हिडिओ यू-ट्यूबवरून डिलीट केले आहेत. असा तयार केला हा व्हिडिओ......

 

- मुंबईतील लालबाग भागातील या 'डेयरडेविल्स' तरूणाचे नाव प्रणाल चव्हाण आहे. पेशाने मॅकेनिकल इंजिनियर प्रणाल स्टंटचा दिवाना आहे. 
- काही दिवसापूर्वी त्याने वरळी आणि परेळ भागात बनत असलेल्या तीन उंच बिल्डिंगची सिक्यूरिटी तोडून त्याच्या टॉपवर पोहचला आणि धोकादायक सेल्फी घेतली.
- इमारतीच्या टॉपवर चालताना प्रणालने आपल्या मोबाईल फोन आणि सेल्फी स्टिकच्या सहाय्यतेने एक व्हिडिओ सुद्धा बनवला. थोडी जरी चूक झाली असती तरी प्राण गेले असते. 
- यानंतर त्याने हे यू-ट्यूब आणि अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर शेयर केले होते. या व्हिडिओजने प्रणालला लोकप्रिय बनण्याऐवजी संकटात टाकले.
- कोणी तरी त्याचा व्हिडिओ हा व्हिडिओ मुंबई पोलिसांना पाठवला आणि मुंबई पोलिसांनी प्रणालची खरडपट्टी काढत पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले आहे. 
 
पोलिसांनी काढली खरडपट्टी- 

 

- या घटनेनंतर पोलिसांनी प्रणालची जोरदार खरडपट्टी काढली. तसेच यापुढे असे वागल्यास कारवाई करू असे धमकावले.
- याबाबत प्रणालचे म्हणणे आहे की, "मी आपल्या जीवनात काही तरी वेगळे करू इच्छितो. मी देशातील पहिला 'अर्बन फ्री क्लायंबर' बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. मला माहित आहे की, हे बेकायदेशीर आहे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र, माझ्या कुटुंबियांचे मला समर्थन आहे. त्यामुळे मी माझे व्हिडिओ यू-ट्यूबवरून हटविले आहेत."
- प्रणालच्या व्हिडिओबाबत सीनियर पोलिस ऑफिसर गजानन देसुरकर यांनी सांगितले की, "हे कृत्य खूपच धोकादायक आणि धक्कादायक आहे. याविरोधात ट्रेसपासिंग आणि ठरवून जीव धोक्यात घालण्याची केस दाखल होऊ शकते. त्याच्या या कृत्यामुळे तरूणांत स्टंट करण्याची भावना वाढू शकते. सध्या आम्ही प्रणालला समजून सांगितले आहे आणि यापुढे असे काही करणार नाही असे आश्वासन दिले आहे."

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, प्रणालचे काही निवडक फोटोज ....

बातम्या आणखी आहेत...