आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बघा अशी आहे ताशी 120 किमी वेगाने धावणारी हायस्पीड टॅल्गाे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॅल्गोतील आसन व्यवस्था अगदी आरामदायी आहे. कित्येक तास सिटवर प्रवासी बसला तरी त्याला पाठीचा त्रास जाणवणार नाही, याचा विचार सिट डिझाईन करताना करण्यात आला आहे. - Divya Marathi
टॅल्गोतील आसन व्यवस्था अगदी आरामदायी आहे. कित्येक तास सिटवर प्रवासी बसला तरी त्याला पाठीचा त्रास जाणवणार नाही, याचा विचार सिट डिझाईन करताना करण्यात आला आहे.
मुंबई - स्पॅनिश कंपनीने तयार केलेली बहुप्रतीक्षित टॅल्गो रेल्वे मंगळवारी सकाळी ११.३० वाजता मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे दाखल झाली. दिल्ली ते सुरतदरम्यान ही गाडी ताशी १२० किमी वेगाने धावल्याने पहिली चाचणी यशस्वी झाली. टॅल्गो दहा वाजता मुंबईत पाेहोचणे अपेक्षित हाेते. परंतु गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तिला पाेहोचण्यास दीड तास उशीर झाला. मात्र, तरीही या गाडीच्या निमित्ताने हायस्पीड रेल्वेच्या दिशेचा एक टप्पा पूर्ण होणार आहे.
दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसपेक्षा सुमारे तीन तास उशिरा सुटूनही टॅल्गो सुरतला राजधानी एक्स्प्रेसच्या काही मिनिटांच्या अंतराने पोहोचली. या गाडीला भारतीय बनावटीचे गाझियाबादचे इंजिन लावले होते. ताशी १३० किमी वेगाने गाडीची चाचणी घेण्यात आली. या गाडीसाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान सुमारे ७२ वर्षांपूर्वीचे असून सध्या भारतात चाचणीसाठी आयात करण्यात आलेल्या डब्यांची संरचना, त्याचे अभिकल्प (डिझाइन) सुमारे ३२ वर्षांपूर्वीचे आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत हायस्पीड गाडीच्या दाेन ते तीन चाचण्या घेण्यात येणार असून त्यामध्ये ताशी १४० ते १५० किलाेमीटर वेगाची चाचणी घेण्यात येणार अाहे. मथुरा-पलवल या मार्गावर डिझेल इंजिनाच्या मदतीने अगाेदरच ताशी १८० किलाेमीटर वेगाची चाचणी यशस्वी झाली अाहे. त्यामुळे मुंबई - दिल्ली मार्गावर ताशी १८० किलाेमीटर वेगाचे लक्ष्य ठेवण्यात अाले असून भारतीय डिझेल बनावटीचे इंजिन त्यासाठी सक्षम असल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

- प्रत्येक डब्यात प्रवाशांच्या माहितीसाठी एलईडी स्क्रीन
- खानपान डब्याएेवजी खास डायनिंग डबा, जेवणासाठी छाेटेखानी डायनिंग टेबल
- या गाडीचे डबे लांबी, रुंदीने कमी असून वजनाने हलके आहेत.

अशी अाहे हायस्पीड ट्रेन
या गाडीला नऊ डबे असून त्यात काेच जनरेटर, रेस्टाॅरंट कार, पाच सामान्य एसी कुर्सी यान, दाेन एक्झिक्युटिव्ह काेच, सामान्य डब्यात ३६ तर एक्झिक्युटिव्ह डब्यात २० अासने अाहेत.

पुढील चाचण्या डिझेल इंजिनाच्या मदतीने
दिल्लीते सुरत हे अंतर ताशी १२० किलाेमीटर वेगाने पूर्ण करण्यात यश अाले. या मार्गावरील पुढील तीन चाचण्यांमध्ये डिझेल इंजिनाच्या मदतीने पहिल्यांदा ताशी १३० किलाेमीटर, दुसऱ्यांदा १४० आणि तिसऱ्या चाचणीत हा वेग वाढवत ताशी १५० किलाेमीटरपर्यंत नेण्यात येणार अाहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अत्याधुनिक टॅल्गो ट्रेनचे फोटो..... बघा आत कशा आहेत सोईसुविधा....
बातम्या आणखी आहेत...