आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे या कपलचा फोटो, वाचा कोण आहेत हे दोघे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअपवर सध्या एक सावळ्या रंगाचा मुलगा आणि सुंदर मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. या पोस्टवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट करून त्यांची खिल्ली उडवत आहेत. फोटोमध्ये दिसणारा हा व्यक्ती दिसायला भलेही साधा दिसत असेल परंतु याच्या लूकवर जाऊ नका, कारण हा कोणी सामान्य व्यक्ती नसून खास हस्ती आहे.

डायरेक्टर आणि स्क्रीन रायटर...
- हा फोटो तामिळ चित्रपटांचे डायरेक्टर आणि संकीर्ण रायटर एटली कुमार यांचा आहे.
- 21 सप्टेंबर 1986 मध्ये तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे जन्मलेल्या एटली कुमार यांचे संपूर्ण नाव अरुण कुमार आहे.
- 2013 मध्ये एटली कुमार यांनी 'राजा राणी' चित्रपटापासून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.
- या चित्रपटाने साऊथ इंडियन बॉक्स ऑफिसवर चार आठवड्यातच 500 मिलियनपेक्षा  जास्त कमाई करून मोठे यश संपादन केले होते.

3 इडियट्स चित्रपटाचा रिमेक केला...
- एटली कुमार यांनी प्रसिद्ध डायरेक्टर एस शंकर यांच्याकडे पाच वर्ष काम केले.
- असिस्टंट डायरेक्टर कुमार यांनी फिल्म Nanban (2012) मध्ये एस शंकर यांच्यासोबत काम चालू ठेवले. हा हिंदी चित्रपट 3 इडियट्सचा रिमेक होता.
- कुमार यांनी अ अॅपल प्रोडक्शन सुरु केले आणि फॉक्स स्टार स्टुडिओच्या मदतीने  'Sangili Bungili Kadhava Thorae' चित्रपट बनवला.

कृष्णा प्रियासोबत लग्न
- जवळपास 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर एटली आणि कृष्णा प्रिया लग्नाच्या बंधनात अडकले.
- 2014 मध्ये झालेल्या या जोडीच्या लग्नाला दक्षिण भारतातील दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती.
- कृष्णा प्रिया प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून विविध सीरिअल्समध्ये मुख्य भूमिकेत काम केले आहे.
- या व्यतिरिक्त साऊथचा सुपरहिट चित्रपट सिंघममध्ये दिव्या महालिंगमच्या भूमिकेत कृष्णा प्रिया आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, यांचे इतर काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...