आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tamils Protest Against Salman Khan Over Support To Rajapaksa

PHOTOS: मुंबईत तमिळींची अभिनेता सलमान खानच्या घरासमोर निदर्शने!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सलमान खान याच्या बांद्र्यातील घराबाहेर तमिळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. श्रीलंकेत होत असलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष महेंद्रा राजपक्षे यांचा प्रचार केल्याने तामिळ संघटना आक्रमक झाल्या आहेत. सलमानच्या घराबाहेरील निदर्शने करणा-या 10 ते 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याचबरोबर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे.

श्रीलंकेत 8 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे महेंद्रा राजपक्षे यांच्या प्रचारासाठी सलमान खान श्रीलंकेत गेला होता. यावेळी त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री आणि मूळची लंकेची असलेली जॅकलीन फर्नांडिसही होती. माजी मिस श्रीलंकन जॅकलीन हिने बॉलिवूडमध्ये चांगलेच बस्तान बसवले आहे. तसेच तिची सलमान खानची जवळीक आहे. राजपक्षे यांचा मुलगा नमल यांचीही जॅकलिन चांगली मैत्रिण आहे. त्यामुळे सलमान व जॅलकिन या श्रीलंकेत हिट झालेल्या जोडीने आपल्या वडिलांचा प्रचार करावा अशी गळ नमलने जॅकलिनला घातली.
जॅकलिनने इकडे आपला मित्र सलमानला याबाबत तयार केले होते. त्यानंतर बॉलिवूडच्या दबंग खानने निवडणुकांच्या निमित्ताने सध्या श्रीलंकेत हजेरी लावली. चार दिवसापूर्वी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या प्रचारासाठी सलमान खान श्रीलंकेला गेला व जॅकलिन फर्नांडिस आणि अन्स पाच कलाकारांसह सलमानने श्रीलंकेत राजपक्षे यांचा जोरदार प्रचार केला. श्रीलंकेतील निवडणुकांसाठी भारतीय अभिनेत्याने हजेरी लावलेला सलमान हा पहिला हिरो ठरला.
दरम्यान, सलमानने केलेल्या प्रचाराला तामिळनाडूतील डीएमके पक्षाने विरोध केला होता. सलमान खानने राजपक्षे यांच्याशी केलेल्या हस्तांदोलनाच्या फोटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या तामिळ नागरिकांनी सलमान खानविरोधात आज मुंबईत जोरदार निदर्शने केली.
पुढे पाहा, सलमान खानने श्रीलंकेत राजपक्षेंचा कसा केला प्रचार व तामिळ नागरिक का संतापले...