आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tamils Protest Against Salman Khan Over Support To Rajapaksa

सलमानच्या घराबाहेर तामिळ संघटनांची निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद राजपक्षे यांचा प्रचार केल्याच्या विरोधात तामिळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी जोरदार निदर्शने करून घोषणाबाजी केली.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या तामिळ संघटनेच्या 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आठ जानेवारी रोजी श्रीलंकेत अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. यासाठी राजपक्षे यांच्या प्रचारासाठी सलमान खान श्रीलंकेत गेला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही होती. सलमानने श्रीलंकेत जाऊन राजपक्षे यांचा प्रचार केल्यानंतर तामिळनाडूतील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एमडीके, एमडीएमके या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सलमानवर टीकेची झोड उठवली होती.