आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तारापूर एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला आग; चौघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तारापूर एमआयडीसीमधील एका केमिकल फॅक्टरीत एका पाठोपाठ एक असे चार स्फोट होऊन एका अभियंत्यासह चौघांचा मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली. आगीनंतर ठाणे एमआयडीसीचा अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश मिळाले आहे. तारापूर एमआयडीत आरती ड्रग्ज ही कंपनी आहे.

सकाळी कंपनीतील मिथेल निट्रो रसायन नायट्रेला मिळाल्याने ही आग लागली. यानंतर आगीने रौदरूप धारण केले व सलग चार स्फोट झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने इतर कंपन्यांनाही त्याची झळ बसली.