आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तटकरेंविरोधातील याचिका हायकाेर्टाने निकाली काढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांबाबतची चौकशी राज्य सरकारने सुरू केली असून ती योग्यरीत्या पार पाडली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाला देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे खासदार किरीट सोमया यांनी दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. मनी लाँडरिंग व भूखंड हडपण्याच्या प्रकरणात ही याचिका दाखल झाली होती. मात्र याचिकाकर्त्यांना तपासात काही त्रुटी आढळल्या तर ते पुन्हा याचिका दाखल करू शकतात असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारचे हंगामी महाधिवक्ता अनिल सिंह यांनी याबाबत राज्य सरकारने अगोदरच चौकशीचे आदेश दिल्याचे स्पष्ट करत एसीबी आणि ईडीच्या वतीने तपासाला सुरूवात करण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यावर न्या. एन.एच.पाटील आणि न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढण्याचा निर्णय दिला. या प्रकरणात योग्य तपास केला जाईल अशी हमी राज्य सरकारच्या वतीने आम्हाला देण्यात आल्याने ही याचिका सुनावणीसाठी ठेवण्याची काहीच गरज नाही.
नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...