आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधवांच्या जातिवाचक शब्दांनी तावडे संतापले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सांगलीतील अनुदानित वसतिगृहांना भोजन अनुदान न मिळत नसल्याबद्दल विधानसभेत गुरुवारी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, या प्रश्नावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याऐवजी शिक्षणमंत्री विनोद तावडे बोलायला उभे राहिल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे सांगलीतील अनुदानित वसतिगृहांना भोजन अनुदान न मिळाल्याबाबत सुधारित उत्तरातही मंत्र्यांनी माहिती लपवल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी जातिवाचक उल्लेख केल्याचा अाराेप करत तावडेंनी सभागृहात संताप व्यक्त करत त्यांना जाब विचारला.
सांगली जिल्ह्यात ६७ अनुदानित वसतिगृहे असून यापैकी ६३ वसतिगृहांना पुरेशी तरतूद न झाल्याने ५० टक्के अनुदान देण्यात आले. उर्वरित चार वसतिगृहांना ६५ टक्के अनुदान दिले गेलेे, उरलेला निधी देण्यासाठी पूरक मागण्यांमधून देण्यात येणार आहे, असे उत्तर बडोले यांनी दिले. यावर आक्षेप घेत दिलीप वळसे पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांनी मूळ माहिती मंत्री लपवत असल्याचा आरोप केला. सुधारित उत्तरात ही माहिती नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या िनदर्शनास आणून दिले. यावर बडोलेंनीच स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे पाटील व चव्हाण म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या उत्तरावर अाक्षेप
संबंिधत खात्याचे मंत्री उत्तर देत नसल्याने नाराज झालेल्या िवरोधकांनी उल्हासनगर रुग्णालयाच्या दुरुस्तीचा प्रश्नावरही आक्षेप घेतला. ‘हा प्रश्न सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे सोपवायला हवा होता. मात्र, त्यावर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देणे अपेक्षित नाही,’ अशी सूचना केली. त्यावर ‘उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मंजुरीनंतर दुरुस्ती करण्यात येईल,’ असे उत्तर त्यांनी दिले.
‘मागासवर्गीय का म्हणता?’

विराेधकांच्या प्रश्नावर बडोलेंनी उत्तर देण्याऐवजी तावडे उभे राहिले. यामुळे संतापलेल्या विरोधकांनी ‘तावडे हे सामाजिक खात्याचे मंत्री नाहीत, त्यामुळे त्यांनी हे उत्तर देऊ नये,’ असे सुनावले. या गोंधळात राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी जातिवाचक शब्द वापरल्याचा आक्षेप तावडे यांनी घेतला. संतापलेले तावडे तावातावाने म्हणाले, ‘मागासवर्गीय शब्द तुम्ही का वापरला? तुम्हाला बोलता येत नाही.’ यानंतर सत्ताधारी व विरोधकांत घोषणाबाजी झाली आणि गोंधळामुळे सभागृह दहा मिनिटांसाठी तहकुब झाले. पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर वळसे पाटील यांनी या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. शेवटी बडोले म्हणाले, ‘जाधव यांनी चुकीचा शब्द वापरायला नकाे हाेता. सांगलीतील वसतिगृहांना १५ दिवसांत अनुदान देण्यात येईल.’