आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीबीजी समूह मराठी चित्रपट सृष्टीत; ‘भाकर’नंतर ‘काव काव कावळे’ची निर्मिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी चित्रपटाला चांगले दिवस येत असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. मुंबई, नाशिक आणि पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेंद्र पवनकुमार सिंह मराठी चित्रपट निर्मितीत उतरत आहेत. ‘काव काव कावळे’, ‘धावपळ’ या दोन मराठी चित्रपटांसोबत ते एका हिंदी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

तिरुपती बालाजी ब्रँडनेम अंतर्गत सिंह यांनी आजवर अनेक प्रोजेक्ट पूर्ण केलेले असून काही प्रोजेक्टचे काम सुरू आहे. समूहाच्या चित्रपट निर्मितीत उतरण्याच्या मनसुब्याबद्दल ‘दिव्य मराठी’शी बोलताना सिंह म्हणाले, मी अमराठी असलो तरी मनाने मराठीच आहे. मराठी चित्रपटाची सुधारत असलेली स्थिती पाहून आपणही मराठी चित्रपट निर्मितीत उतरावे असे मला वाटू लागले. मॉरिशस येथे होणार्‍या मराठी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मी मराठी चित्रपटसृष्टीच्या जवळ आलो आहे. त्यामुळेच तयार झालेला ‘भाकर’ चित्रपट आम्ही आमच्या पंखाखाली घेतला. मात्र, आता आम्ही ‘काव काव कावळे’ या विनोदी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी आम्ही तिरुपती बालाजी मोशन पिक्चर्स या बॅनरची स्थापना केली आहे. मराठी चित्रपटाला हिंदीच्या तोडीचे स्थान देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठीसोबतच आम्ही हिंदी चित्रपट निर्माण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आशा भोसले, सुरेश वाडकर यांचे गायन
‘काव काव कावळे’ हा एक ब्लॅक कॉमेडी पद्धतीतील चित्रपट असून यात सामाजिक अवमूल्यनावर आम्ही भर दिलेला आहे. चित्रपटात नीलेश साबळे, विजय चव्हाण, अरुण नलावडे, विद्याधर जोशी हे कलाकार असून संगीत वैशाली सामंतने दिले आहे. प्रख्यात गायिका आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी यातील गाण्यांना आवाज दिलेला आहे. या चित्रपटानंतर
विनोदी चित्रपट ‘धावपळ’ आम्ही सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.