आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टीडीआर टीबी' वृत्तामुळे जनतेने घाबरू नये - मुख्यमंत्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईमध्ये 'टीडीआर टीबी' चा एकही रुग्ण आढळलेला नाही, असा केंद्रीय आरोग्य पथकाचा निष्कर्ष असून अशा प्रकारच्या संशयित रुग्णांवर केलेल्या उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरू नये, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केले.
मुंबईतील एका खासगी रुग्णालयामध्ये कथित टीडीआर(टोटली ड्रग रेझिटस्टंट)-टीबी रुग्ण आढळून आल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग व केंद्रीय आरोग्य पथकाच्या तज्ज्ञांसोबत मंत्रालयामध्ये गुरुवारी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. कोणत्याही औषधोपचारांना दाद न देणारा असा टीबी अस्तित्वात नसल्याचा निष्कर्ष केंद्रीय आरोग्य तज्ज्ञांच्या पथकाने काढला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. मुंबईत आढळून आलेल्या टीबी रुग्णांशी संबधित संपूर्ण माहिती व त्यावर केले जाणारे उपचार याबाबत बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. खासगी रुग्णालयांनी केलेल्या संशोधनाला आम्ही नक्कीच श्रेय देऊ. पण त्यांनी सरकारी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून आपल्याकडील अशा प्रकारच्या रुग्णांची माहिती द्यावी, असे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले.