आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांनाच संस्कृती शिकवा सांस्कृत‍िक मंत्री देवतळे यांना उद्धव ठाकरे यांचा सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘शिवसेनेकडे येणा-या कलाकारांना रोखण्याची भाषा करणा-या अजित पवार यांना सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी संस्कृती शिकवावी,’ या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी टीका केली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या पाच लाख रुपयांवरून टीका करणा-या विकृत पत्रकारांना ते पाच लाख द्यावेत, असा टोलाही लगावला.


दक्षिण मुंबई विभाग क्रमांक सातच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव म्हणाले, की, सध्या ग्रामीण भागातही बोगस मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहे. त्यावरून शहरात किती बोगस मतदार असतील याची कल्पना येते. विभागातील बोगस मतदारांना शोधून काढा, असे आवाहनही त्यांनी केले.