आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teach Hyderabad Freedom Struggle In Schools, Uddhav Appeal To Government

हैदराबाद मुक्तिलढ्याचा इतिहास शाळांतून शिकवा, उद्धव ठाकरे यांचे सरकारला आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मराठी माणूस, त्याचा लढा हे समीकरण न संपणारे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासह हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढादेखील अभ्यासक्रमातून भावी पिढीसमोर मांडणे गरजेचे आहे. उद्याने मोकळा श्वास घेण्यासाठी आहेतच, पण त्यातून इतिहासाची प्रतीके साकारून इतिहासाचा सुगंध उद्यानांत दरवळणार असेल तर ती श्रद्धांजलीच आहे. इतिहासाच्या आठवणींचे जतन करणे व पुढच्या पिढीकडे पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे,’ असे उद‌्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.

मुंबई महापालिकेच्या वतीने नायगाव येथील बॉम्बे डाइंग मिलच्या परिसरात तयार करण्यात येणा-या संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या थीम गार्डनचे भूमिपूजन रविवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. राज्य मंडळ अभ्यासक्रमाच्या शाळांत तर संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास लावला जाईलच; परंतु सीबीएसई आणि आयबी या केंद्र सरकारच्या अखत्यारीत बोर्डाच्या अभ्यासक्रमांतही संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास समाविष्ट करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी दिली.