आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Constituncy Cancel, Direct Election Of Sarpanch?

शिक्षकांचा मतदारसंघ रद्द; सरपंचांच्या थेट निवडणुका? फडणवीस यांनी दिले बदलाचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरपंच आणि उपसरपंचपदासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर राजकीय साठमारी व भ्रष्टाचार होत असल्याने आता या दोन्ही पदांच्या निवडणुका थेट घेण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. तसेच राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघही रद्द करण्याबाबतही विचार करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले.
काही निवडक पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरपंच आणि उपसरपंचाची निवड करताना मोठ्या प्रमाणावर राजकीय तडजोड व आर्थिक व्यवहार केले जातात. काही वेळा दहशतीचे वातावरणही निर्माण केले जाते. हे गैरप्रकार टाळण्यासाठी सरकार थेट लाेकांमधून या पदांची निवड व्हावी, असा विचार करत अाहे.’

‘महापौरांचीही निवड अशीच करणार का?’ या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘महापौरपदाची अशा प्रकारे निवड करणे सोपे नाही. मुंबई महापालिकेचा व्याप मोठा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने महापौर निवडल्यास त्याला अधिकार देणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवड प्रक्रियेत बदलाचा
विचार नाही.’

पुढे वाचा, सेवा हमी कायदा हाेणारच