आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी घेतलेल्या पहिल्याच शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) ९5 टक्के भावी गुरुजी सपशेल फेल झाले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 15 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या ‘टीईटी’चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
या परीक्षेत पहिली ते पाचवीसाठीच्या शिक्षकांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 4.43 टक्के, तर सहावी ते ८ वीच्या शिक्षकांचे पास होण्याचे प्रमाण 5.९5 टक्के आहे. पहिल्यावाहिल्या टीईटीच्या नीचांकी निकालामुळे राज्यातील भावी शिक्षकांच्या गुणवत्तेचेच जोरदार धिंडवडे मात्र निघाले आहे.
राज्यात 15 डिसेंबर रोजी 1,1९९ केंद्रांवर घेण्यात आलेल्या टीईटीमध्ये ६ लाख 21,115 शिक्षक उमेदवार बसले होते. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेतील त्रुटी परीक्षा परिषदेने दुरुस्त करून घेतल्या होत्या. टीईटीमध्ये अनेक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेर विचारण्यात आले होते. त्यावर शिक्षक व विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला होता. काही शिक्षक आमदारांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र शिक्षण विभागाने आपल्या निर्णयात बदल न करता निकाल जाहीर केला.
1 ते 5 च्या शिक्षकांचा निकाल
माध्यम उपस्थिती पात्र टक्के
मराठी 340325 15995 4.70%
इंग्रजी ६८1७ ९८ 1.44%
उर्दू 20754 ९७1 0.91%
एकूण 3६७८९६ 1६2८1 4.43%
6 ते 8 वी शिक्षकांचा निकाल
मराठी 206540 12८८1 ६.24%
इंग्रजी 10232 2६0 2.54%
उर्दू 7322 195 2.६६%
एकूण 224094 1333६ 5.९4%
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.