आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती विभागाचे आमदार श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे आमदार दत्तात्रय सावंत व माजी शिक्षण संचालक ज.मु.अभ्यंकर  पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व सेवकांसमवेत. - Divya Marathi
अमरावती विभागाचे आमदार श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे आमदार दत्तात्रय सावंत व माजी शिक्षण संचालक ज.मु.अभ्यंकर पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व सेवकांसमवेत.
 पंढरपूर (खर्डी) - आगामी काळात राज्यातील सर्व मराठी माध्यमाच्या शाळा चालल्या पाहिजेत. समाजात शिक्षकाला सरकार, संस्था, मुले पालक संभाळून सर्वतऱ्हेची कसरत करत शिकवावे लागत आहे. कागदी काम वाढत आहे, हे सर्व थांबले पाहिजे, असे ठाम मत अमरावतीचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या कार्यक्रमात बोलत होते.
 
यावेळी 5 जिल्हे आणि 58 तालुक्यातील माध्यमिक शाळांत कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक तसेच शाळा, कला, क्रीडा व अन्य सामजिक, सहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना आदर्श कृतिशील व्यक्ती म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्य, जिल्हा तसेच तालुका पातळीवरील असे एकूण 140 कार्यकारी व्यक्तींना यावेळी गौरवण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, प्रमाणपत्र, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंबई येथील शिक्षक सेनेचे तसेच माजी शिक्षण संचालक ज.मु.अभ्यंकर होते. आपल्या मनोगतात ते म्हणाले, 'पूर्वी तुकडी वर शिक्षक नेमले जात. आता विदयार्थी पटावर शिक्षक संख्या ठरत आहे. हे चुकीचे आहे. केंद्र व राज्याच्या समान शैक्षणिक पात्रता, समान काम, वेळ असणाऱ्या शिक्षक बांधवांच्या पगारात 10 हजाराची त्रुटी राहिली होती. ती आता 7 व्या आयोगात भरून काढण्यासाठी प्रसंगी आंदोलन उभारावे लागेल.'  
 
कार्यक्रमाचे प्रास्तविक पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले. तर सूत्र संचालन राजेंद्र आसबे यांनी केले. व्यासपीठावर कोल्हापूर जिल्हा प्रमुख बाबा पाटील, सांगलीचे जिल्हाप्रमुख जे. एस. आप्पा, पुणे जिल्हाप्रमुख कल्याण बर्डे सातारा जिल्हाप्रमुख विजय येवले, सोलापूर जिल्हा प्रमुख गुरुनाथ वंगीकर चेअरमन शंकर वडणे उपस्थित होते.
  
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाधान घाडगे, समाधान दुधाट, मारुती गायकवाड, शिवाजी शेंडगे, अमोल कुलकर्णी, कुंडलिक पवार, राजेश पवार, भीमा व्यवहारे, अरविंद शिंदे, यशवंत अंकुशराव, यांसह कृती समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला 5 जिल्ह्यातून 3000 शिक्षक उपस्थित होते.
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...