आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेचा पगार मिळत नसल्याने शिक्षकांचे पालकांकडून कर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सिलिगुडीमध्ये एक हिंदी माध्यमिक शाळा आहे. येथील 13 शिक्षक पालकांच्या दयेवर जगत आहेत. शाळेकडून वेतन मिळत नसल्यामुळे ते पालकांकडून ठरावीक तारखेला पैसे घेऊन महिन्याचा खर्च भागवत आहेत. पालकही त्यांना बिनव्याजी कर्ज देत आहेत. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी शिक्षकांची मदत करत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळा व्यवस्थापनातील सदस्य सीताराम दालमिया म्हणाले, शिक्षक माझे ऐकत नसतील तर मी त्यांना वेतन का द्यावे? विशेष म्हणजे सर्व शिक्षक आपापल्या तासिकांमध्ये शिकवत असतात.