आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे वेतन, पेन्शन एक तारखेला मिळणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिक्षकांचे वेतन आणि पेन्शन आता सरकारी कर्मचा-यांप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामविकास विभागाने तसा प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.


राज्यातील साधारण 1800 शिक्षक 1972 मध्ये रुजू झाले होते. हे सर्व शिक्षक लवकरच निवृत्त होतील. यापैकी अनेकांकडे आवश्यक पदवी नसल्याने त्यांच्या पेन्शनचा प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून विभागाला सविस्तर प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे.
मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून दोन स्वतंत्र व्यक्तींची नियुक्ती करावी, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे.


जिल्हा परिषद शाळांतील डीएड किंवा बीएड पदवीधारक शिक्षकांना पेन्शन व सहाव्या वेतन आयोगानुसार गुणवत्ता प्राप्त शिक्षक आणि कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग विचार करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिल्यानंतर शिक्षकांना एक तारखेला पगार आणि निवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पुढील आठवड्यात होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेला येण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.