आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Teacher's Day Special Aadarasha Teacher Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदर्श शिक्षक आता होणार लखपती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रीय आणि राज्य सरकारकडून आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढीच्या लाभाऐवजी एक लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला घेतला आहे.

आदर्श शिक्षकांना शासन दोन आगाऊ वेतनवाढी देत होते. मात्र सहावा वेतन आयोग लागू केल्यापासून त्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे पुरस्कार मिळूनही शिक्षकांना बक्षिसापासून वंचित राहावे लागत होते. वेतनवाढीपेक्षा ठोक रक्कम देण्याचा निर्णय विचाराधीन होता. गुरुवारी शिक्षण विभागाने परिपत्रक काढले. २०१३-१४ वर्षापासून त्याचा लाभ होईल. बक्षिसापासून वंचित आदर्श शिक्षकांचे काय, असा प्रश्न संघटना विचारण्याची शक्यता आहे.