आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील गुरुजींचे वेतन एक तारखेलाच मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील अनुदानित शाळांत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना फेब्रुवारी महिन्यापासून ऑनलाइन पद्धतीने 1 तारखेला पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

काही महिन्यांपासून शिक्षकांच्या ऑनलाइन पगाराची सोय करण्यात आली आहे. परंतु ‘शालार्थ’ सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे हजारो शिक्षकांचे पगार 1 तारेखस मिळण्यास उशीर होत होता. मात्र, या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारीपासून राज्यतील शिक्षकांना 1 तारखेस थेट बँकेत वेतन मिळेल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

‘शालार्थ’मधील त्रुटींमुळे दिवाळीतही शिक्षकांचे पगार रखडले होते. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतन ऑफलाइन पद्धतीने देण्याची नामुष्की ओढावली होती. आता त्रुटी दूर केल्या असल्या तरी ग्रामीण भागातील कोअर बँकिंग आणि इंटरनेटच्या अपुर्‍या सुविधांमुळे ‘शालार्थ’चे घोडे कुठवर जाईल, याबाबत शिक्षक साशंक आहेत.