आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - देशात आम्ही राजकीय पर्याय द्यावा म्हणून सर्वच स्तरातून मागणी होत होती. मात्र, असा पर्याय देणे तेवढे सोपे नाही. देशातील सर्व सहा लाख ग्रामसभांनी आमच्या राजकीय पर्यायाला पाठिंबा देणारे प्रस्ताव पारित करायला हवेत, असे अण्णा हजारे यांनी रविवारी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात उपोषण मागे घेतल्यानंतर प्रथमच अण्णा ब्लॉगवर परतले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, संसद लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. यात गुन्हेगार बसले तर पावित्र्य राहणार कसे? चारित्र्यवान, शुद्ध आचार, निष्कलंक जीवन, त्याग, राष्ट्रप्रेम, सेवाभाव असलेले लोक संसदेत पोहोचले तरच भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण होईल. अनेक लोक म्हणतात, असे चारित्र्यवान लोक मिळणार कसे? 120 कोटींच्या या देशात 1 हजार चारित्र्यवान लोक मिळणार नाहीत? चारित्र्य आणि त्यागाची या देशाला परंपरा आहे. असे लोक शोधले तर निश्चितपणे मिळतील.
सरकारने भाग पाडले : मी 40 वर्षांपूर्वी जाहीर केले होते की, राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. मात्र, सत्तेत असलेले राजकीय पक्ष बधिर झाले आहेत. त्यांनीच आम्हाला राजकारणात येण्यास भाग पाडले. जनतेला पर्याय हवा होता. नामांकित 23 लोकांनी आम्हाला पत्र लिहून राजकीय पर्याय निर्माण करणे आवश्यक असल्याचे कळवले असल्याचे अण्णांनी नमूद केले आहे.
रामदेव बाबांच्या उपोषणासाठी टीम अण्णाला निमंत्रण नाही!
राजकारण चांगल्या माणसांचे
आता टीम अण्णा लढवणार निवडणूक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.