आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संघ जाहीर, 11 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वर्ल्डकप !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- क्रिकेट वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे 15 चेहरे पुढे आले आहेत. आजपर्यंतची ही सर्वात युवा टीम आहे. टीममधील 15 पैकी 11 खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळतील. मात्र युवराजला टीममध्ये घेतले नाही. धोनीलाच तो टीममध्ये नको होता असे सांगितले जाते. 14 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत स्पर्धेचे उद‌्घाटन होणार आहे, तर मेलबर्नमध्ये 29 मार्च रोजी अंतिम सामना होईल. या दरम्यान 49 सामने खेळवले जातील.
14 फेब्रुवारीपासून न्यूझीलंडमध्ये स्पर्धेचा प्रारंभ, 29 मार्च रोजी ऑस्ट्रेलियात अंतिम लढत

फलंदाजीचे सामर्थ्य
5 फलंदाज : विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना.
4 वेगवान गोलंदाज : भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, मो. शमी, उमेश यादव.
1 फिरकीपटू : आर. अश्विन.
3 ऑलराउंडर : रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल.
2 यष्टिरक्षक : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायडू.
दोन नावांनी केले चकित
स्टुअर्ट बिन्नी : अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड. मात्र, अवघ्या 6 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव. यात त्याने 40 धावा आणि 9 गडी बाद केले.

अक्षर पटेल : 9 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव. यात 40 धावा व 14 विकेट घेतल्या. (दोघांपैकी एकालाच अंतिम अकरात संधी मिळेल.)
यामुळे या वेळी जिंकण्याची आशा-
सर्वात युवा टीम : सरासरी वय 26 वर्षे. 2011 मध्ये टीमचे सरासरी वय 28 वर्षे आणि 1983 मध्ये 27 वर्षे होते.
फलंदाजी क्रम : दोन दुहेरी शतके ठोकणारा रोहित आणि वयाच्या 25 व्या वर्षी शतक ठोकणारा एकमेव खेळाडू विराट टीममध्ये. 140 किमी वेगाने चेंडू फेकणारा ईशांत, शमीसारखे गोलंदाज.
धोनीसारखा यशस्वी कर्णधार
वनडे वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा एकमेव कर्णधार.

15 फेब्रुवारीला भारताचा पहिला सामना पाकशी

वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. आजपर्यंत वर्ल्डकपमध्ये दोघांत ५ सामने झाले. भारतच जिंकला.
क्वार्टरमध्ये जाणे नक्की : भारताच्या गटात पाक, द. आफ्रिका, इंडिज, यूएई, आयर्लंड व झिम्बाब्वे. भारताने तीन सामने खेळले तरीही क्वार्टरमध्ये खेळेल. म्हणजेच नॉकआऊट खेळणे निश्चित.

यामुळे युवराजला डच्चू
युवराजच्या निवडीची शक्यता होती. पण जडेजाचा फिटनेस रिपोर्टनंतर ती मावळली.
युवी अष्टपैलू फलंदाज आहे. संघ व्यवस्थापनाला अष्टपैलू गोलंदाज हवा होता.
टीमची फलंदाजी भक्कम. फलंदाज म्हणून युवीला टीममध्ये स्थान नव्हते.
फिटनेस फारसे चांगले नाही. ऑस्ट्रेलियातील मोठ्या मैदानांवर झगडावे लागते.