आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टेकफेस्ट’मध्ये अनुभवता येणार रोबो युद्ध, सुपरकारचा थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विज्ञान-तंत्रज्ञानातील नावीन्य, पर्यायी तंत्रज्ञान आणि भन्नाट दृष्टिकोन यासाठी मुंबईचा आयआयटी ‘टेकफेस्ट’ प्रसिद्ध आहे. रोबो युद्ध, सुपर कार आणि भारतरत्न शास्त्रज्ञ प्रा. राव यांच्याशी संवाद साधण्याची संधी यंदाच्या टेकफेस्टचे आकर्षण आहे. मुंबई आयआयटीमध्ये 3 ते 5 जानेवारी दरम्यान हा टेकफेस्ट होत आहे.
मुंबई टेकफेस्ट आशिया खंडातील सर्वात मोठा विज्ञान
मेळावा म्हणून ओळखला जातो. यंदा 2 हजार 300 महाविद्यालये या ‘फेस्ट’मध्ये सहभागी होतील. यात जर्मनी, जपान आणि अमेरिकेतील महाविद्यालयांचाही सहभाग आहे. या दोन दिवसांत लाखभर तरुण या ‘फेस्ट’ला भेट देण्याचा अंदाज आहे.
भविष्यात रोबोट युद्ध कसे असेल याची चुणूक यामध्ये पाहण्यास मिळणार आहे. यंदाचे पाहण्यास मिळणार्‍या त्या रोबोटचे नाव बीना 48. वार्‍याशी स्पर्धा करणार्‍या सुपरकार येथे पाहण्यास मिळतील. फेरारी 430, प्रोश्को 911 आणि मर्सिडीझ ई अशी ती मॉडेल्स आहेत. या मोटारी चालवण्याची संधीही यात उपलब्ध आहे. भारतरत्न शास्त्रज्ञ सी. एन. राव, किरण बेदी, संगणकतज्ञ प्रणव मेस्त्री, राजेंद्र पचौरी या प्रख्यात व्यक्तीमत्वाशी संवाद साधण्याची संधी यंदाच्या ‘फेस्ट’ने दिली आहे. थ्रीडी प्रोजेक्शन, व्हिडिओ प्रोजेक्शन, लाईट अ‍ॅनिमेशन आणि इलेक्ट्रिक स्टंट असे प्रकार यंदा प्रथमच पाहण्यास मिळतील. मुंबई आयआयटी (पवई) येथे आयोजित केलेल्या हा ‘फेस्ट’पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. फेस्टमधील प्रवेशासाठी ओळखपत्र पुरेसे आहे. जागतिक पातळीवर गाजलेला या फेस्टचे आयोजन मुंबई आयआयटीचे विद्यार्थी करतात. गेली 16 वर्षे म्हणजे 1998 पासून हा टेकफेस्ट मुंबईत दरवर्षी नेमाने भरतो. विद्यार्थ्यांना आपल्यातील कल्पना, कौशल्य आणि दृष्टिकोण जगाला दाखवण्याची संधी देणारा टेकफेस्ट केवळ आठवड्यावर आला आहे. टेकफेस्टचे काऊंटडाऊन बुधवारपासूनच सुरू झाले असून 800 आयआयटीयन्स आशिया खंडातील सर्वात मोठ्या विज्ञान जत्रेच्या तयारीवर अखेरचा हात फिरवत आहेत.