मुंबई- नागराज मंजुळे दिग्दर्शित'सैराट
'ने आबालवृध्दांसह समस्त प्रेक्षकवर्गाला अक्षरश: 'याड' अर्थात वेड लावले आहे. दुसरीकडे, सैराटची हुबेहूब कॉपी केल्याची एक वास्तव घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. विशेष म्हणजे या कामात प्रेमीयुगुलाला मुलीच्या मैत्रिणीने मदत केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आई-वडिलांकडे सोपवले.
काय आहे प्रकरण?, कोणत्या रोमॅंटिक कथानकामुळे घरातून पळून गेले प्रेमीयुगुल...?- घरातून पळून गेलेल्या मुलीचे वय 16 वर्षे असून तिच्या बॉयफ्रेंडचे वय 20 वर्षे आहे. प्रेमीयुगुलाला मदत केलेल्या मुलीचे वय 14 वर्षे आहे.
- प्रेमीयुगुल नुकताच रिलीज झालेला सुपरहिट मराठी चित्रपट 'सैराट' पाहून घरातून पळून गेले होते. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पकडून मुंबईत आणले.
- पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना बालसुधार गृहात पाठवले आहे. तर मुलाला अपहरण, बलात्काराच्या आरोपावरून पोलिस कोठडीत टाकले आहे.
मुलीची आत्महत्येची धमकी...- मिळालेली माहिती अशी की, मुलीचा 20 वर्षीय मुलावर जीव जडला होता. मुलगा एका कसाईच्या दुकानावर काम करतो.
- मुलीने 27 मे रोजी बोरीवलीतील एका मॉलमध्ये सैराट पाहिला. नंतर तिने बॉयफ्रेंडला फोन करून तिला घरातून पळवून नेण्यास सांगितले.
- मुलाने नकार दिला असता मुलीने त्याला आत्महत्येची धमकीही दिली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पोलिसांनी हे प्रकरण कसे केले ट्रेस...?