आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teenager Raped By Dad, Brothers, Arrested By Navi Mumbai Police.

नवी मुंबई: वाशीत 15 वर्षीय मुलीवर पिता व भावाकडून लौंगिक अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक छायाचित्र)
मुंबई- नवी मुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुलीच्या पित्याला व भावाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा छोटा भाऊही तिच्यासोबत अश्लील कृत्ये करीत होता. संबंधित मुलगी तणावात राहत असल्याचे तिच्या एका शिक्षिकेला लक्षात आले. शिक्षिकने तिला विश्वासात घेऊन माहिती काढल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
शाळेतील शिक्षिकेने पीडित मुलीची संपूर्ण कहाणी मुंबईतील चेतना फाऊंडेशनला दिली. ही एक स्वयंसेवी (एनजीओ) संस्था लहान मुलांसाठी काम करीत आहे. संस्थेच्या मदतीने नवी मुंबईतील एपीएमसी पोलिस ठाण्यात मुलीचा पिता व भावावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून तीनही आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी दिली आहे.
एपीएमसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाशीतील कोपरी भागात आपल्या आई-वडिल व दोन भावांसमवेत राहते. टॅक्सी चालवणा-या पित्याबाबत तक्रार देताना युवतीने सांगितले की, टॅक्सी चालवून आल्यानंतर थकलो आहे असे सांगून तो तिला रोज रात्री मसाज करण्यास सांगत असे. त्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करीत. पित्याचे कृत्य पाहून तिचा मोठा भाऊही तिच्यावर अत्याचार करू लागला. एवढेच नव्हे तर तिचा छोटा भाऊही तिच्याशी अश्लील चाळे करू लागला होता. ही सर्व घटना माहित असतानाही आईने त्याकडे दुर्लक्ष केले असे मुलीचे म्हणणे आहे.